राज्यात भाजपाकडे सर्वाधिक 1,422 ग्रामपंचायती

तरुण भारत लाईव्ह न्युज : राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला . भाजपने एकूण 1422 ग्रामपंचायतींवर विजयी मिळविला असून , पहिला क्रमांकाने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीने 987 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने 1.422, राष्ट्रवादीने 987, शिंदे गट 709, काँग्रेसने 607 ठाकरे गट 571 तर इतर पक्षांनी 887 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

२०२२ च्या ग्रामपंचायती निवडणुकीत सारासार विचार करता भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीला भारी पडल्याचं चित्र दिसून येत आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे 2,473 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने 2,430 ठिकाणी विजय मिळवला. तसेच इतर आघाड्यांनी 1068 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. राज्यातील 616 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल एकूण बलाबल

निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती – 7,682 त्यापैकी

भाजप 1422
शिंदे गट 709
ठाकरे गट 571
राष्ट्रवादी 987
काँग्रेस 607
इतर 887

भाजप शिंदे गटाचे एकूण 2473
मविआ 2430
इतर 1068

एकूण सदस्य संख्या- 65,916 (त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य- 14,028).

निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा- 7,619 (बिनविरोध विजयी सरपंच- 699).

एकूण 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.