तरुण भारत लाईव्ह ।१० जानेवारी २०२३। जळगाव भुसावळ ते पुणे मध्य रेल्वे मार्गावर कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरी लोहमार्गासह अन्य तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे 3 ते 24 जानेवारी दरम्यान 8 मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेच्या कोपरगाव ते कान्हेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान एनआय आणि नॉन एनआय आणि डबल लाईन यार्ड रिमॉडेलिंगची कामे केली आहेत. त्यासाठी 3 ते 24 जानेवारी काळात ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे 21 ते 23 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र एक्स्प्रेस सलग तीन दिवस व अन्य 8 प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे आधीच आरक्षण केले आहे, त्यांना तिकिटाचा परतावा मिळेल. ऑनलाईन तिकीटे काढले असल्यास बँक खात्यात रक्कम वर्ग होईल. तर खिडकीवरून तिकीट काढले आहे त्यांना तिकीट खिडकीवरूनच परतावा देण्यात येईल, असेही रेल्वे प्रशासन अधिकारीस्तरावरून म्हटले आहे.
रद्द करण्यात आलेल्या मेल
एक्सप्रेस 22147-22148 दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस 6 ते 13 व 21 जानेवारी, 12131-12132 दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस 23 जानेवारी, 01135-01336 भुसावळ-दौंड मेमू 5 ते 12 आणि 19 जानेवारी, 11039-11040 कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 21,22,23 जानेवारीला रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे विभागातील प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.