---Advertisement---
जळगाव : प्रचारकांचे समर्पण आणि कार्य हे दीपस्तंभाप्रमाणेच असून व्यक्ती व्यक्तीत राष्ट्राभिमान जागृत करण्याचे कार्य संघाने गत १०० वर्षात केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी जामनेर येथे आयोजित ‘तरुण भारत’च्या ‘दीपस्तंभ प्रचारक’ या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले.
‘तरुण भारत’चा दिवाळी अंक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्ताने संघ प्रचारकांच्या समर्पणाची वाटचालीवर आधारित लेख या अंकातून मान्यवर लेखकांचे लेख देण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या या वाटचालीत ठिकठिकाणच्या प्रचारकांचे काम माहिती आणि देदिप्यमान असेच होते. हाच विषय घेऊन ‘दीपस्तंभ प्रचारक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) चंद्रकांत बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती, तर सर्जना मीडियाचे प्रकल्प सहप्रमुख तथा भाजप बुद्धीजीवी सेल जिल्हाध्यक्ष संजय नारखेडे, तरुण भारत चे संचालक तथा दिवाळी विशेषांक संपादक विभाकर कुरंभट्टी, ‘तरुण भारत’चे संपादक चंद्रशेखर जोशी, संचालक अरविंद देशमुख, शाखा उपस्थिती होती. व्यवस्थापक भावना शर्मा, विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे, पहरचे वार्ताहर शरद बेलपत्रे आर्दीची हस्ते प्रकाशन एका अभ्यासू व्यक्तिमत्वावर यावेळी मान्यवरांच्या दिवाळी अंकाचे करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक हे केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमलकर आहेत.
ही जबाबदारी सोपविण्यात आली व अंक तेवढाच दर्जेदार झाला आहे. प्रत्येक स्वयंसेवक तसेच भाजप कार्यकर्त्यांनाही हा दिवाळी अंक दीपस्तंभाप्रमाणेच ठरेल, असे गौरवोद्गारही गिरीश महाजन यांनी यावेळी काढले. दिवाळी अंकाविषयी विशेषांक संपादक विभाकर कुरंभट्टी व संपादक चंद्रशेखर जोशी यांनी माहिती दिली.
प्रचारकांच्या त्यागातून संघ विस्तारला
यावेळी दिवाळी अंकाचे अवलोकन करून मंत्री गिरीश महाजन म्हणाले. संघाच्या वाटचालीत प्रचारकांचे कार्य फार मोठे आहे. विविध प्रांतांमध्ये त्रास सहन करून त्या काळात व आजही आपल्या प्रेरणा या प्रचारकांच्या कार्यामुळेच टिकवून ठेवता आल्या आहेत. आणि त्यामुळेच संघ देशभर विस्तारला.