---Advertisement---

टाटांची नवीन एसव्हीयू होणार लाँच, २७ किमी मायलेजसह मिळतील हे आधुनिक फिचर्स

by team

---Advertisement---

एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने पुन्हा एकदा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त, ५ -स्टार रेटिंग असलेली २०२५ टाटा पंच फेसलिफ्टच्या रूपातील एसव्हीयू नवीन अवतारात सादर करत आहे. या मोटर्सच्या स्टेस्ट ड्राईव्ह दरम्यान, पंच फेसलिफ्टच्या छायाचित्रांवरुन तसेच इतर तपशिलांकडे पाहिले असता ही एसयूव्ही स्टाइल, सुरक्षा यासोबतच स्मार्ट तंत्रज्ञानाचे उत्तम अशी सांगड घालण्यात आली आहे.

चला वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. यात डिझाइनला ईव्हीसारखा स्पर्श मिळेल. नवीन टाटा पंच फेसलिफ्ट २०२५ ला टाटा पंच ईव्ही सारखीच डिझाइन मिळण्याची अपेक्षितत आहे. या टेस्ट ड्राइव्ह दरम्यान, समोर आणि मागील प्रोफाइलमध्ये पूर्णपणे झाकलेल्या मॉडेलमध्ये काही कॉस्मेटिक बदल दिसून येत आहे. यामुळे ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक दिसेल. नवीन डिझाइनसह नवीन फ्रंट बंपर, ग्रिल पॅटर्न, ईव्ही-प्रेरित डीआरएल, एलईडी टेललाइट्स आणि स्टायलिश अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता दिसत आहे.

कसे असेल इंटीरियर ?

इंटीरियरबद्दल बोलायचे म्हटले की, टाटा पंच फेसलिफ्टला अधिक स्मार्ट आणि प्रीमियम बनवण्यासाठी, त्यात टाटाच्या प्रकाशित लोगोसह नवीन २-स्पोक लेदरेट स्टीअरिंग व्हील मिळणार. यासोबतच, त्यात ७-इंच TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.२-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, नवीन FATC क्लायमेट कंट्रोल पॅनल, वायरलेस चार्जिंग, कप होल्डर आणि फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री सारखी फिचर यात असतील. डॅशबोर्डचा लेआउटमध्ये कोणताही बदल न करता सध्याच्या मॉडेलसारखाच ठेवण्यात आला आहे.

इंजिन आणि कामगिरी

इंजिन आणि कामगिरीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ही SUV पूर्वीप्रमाणेच १.२ लिटर ३-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येईल जी ८६ bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते, तर CNG आवृत्ती ७३.४ bhp पॉवर आणि १०३ Nm टॉर्क देते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT ट्रान्समिशन पर्याय आहेत. या कारचा दावा केलेला मायलेज पेट्रोल व्हर्जनमध्ये २७ किमी प्रति लिटर आणि सीएनजी व्हर्जनमध्ये २६.९९ किमी/किलोग्रॅमपर्यंत असल्याचे म्हटले जाते.

सुरक्षा वैशिष्ट्ये

सुरक्षतेबाबत टाटा पंच फेसलिफ्टला पूर्वीपेक्षा चांगली सुरक्षा मिळणार आहे. फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ६ एअरबॅग्ज, रिव्हर्स कॅमेरा, EBD सह ABS आणि GNCAP क्रॅश टेस्टमध्ये तिने आधीच ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. यासह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी सारखे फिचर्स मिळणार आहेत.

किंमत आणि लाँच टाइमलाइन

सणावाराच्या पार्श्वभूमीवर ही कार भारतीय बाजारपेठेत लाँच

ही कार २०२५ च्या सणासुदीच्या हंगामात भारतात लाँच केली जाऊ शकते आणि तिची अंदाजे एक्स-शोरूम किंमत ६ लाख ते ९.५ लाख रुपयांपर्यंत असू शकते. लाँच झाल्यानंतर, ती ह्युंदाई एक्स्टर, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स आणि सिट्रोएन C3 सारख्या SUV शी स्पर्धा करेल.

जर तुम्ही १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची SUV शोधत असाल जी उत्तम मायलेज, स्टायलिश आणि प्रीमियम डिझाइन, स्मार्ट फीचर्स, सनरूफ, ६ एअरबॅग्ज आणि ५-स्टार सेफ्टी देते, तर टाटा पंच फेसलिफ्ट २०२५ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment