---Advertisement---
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने भाजपमधील अनेक निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात अखेर अंतिम समन्व्य साधण्यात आला आहे. भाजप ४६, शिंदेसेना २३, तर राष्ट्रवादी ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. दुसरीकडे, या निर्णयामुळे अनेक निष्ठावंतांना उमेदवारीपासून डावललं असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.
अर्थात तिकीट नाकारल्याने निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला.









