---Advertisement---

तहसीलच्या पथकाकडून वाळू तस्करांवर कारवाई, दोन ट्रॅक्टरसह एक हायवा जप्त, प्रशासनाकडून दंड आकारणी होणार

---Advertisement---

Jalgaon News : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालयातर्फे विशेष पथकाद्वारे अहोरात्र गस्त घालून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. पथकाद्वारे गस्त घालताना दोन ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक अशी तीन वाहने जप्त करण्यात आली. जिल्ह्यात वाळूची सर्रासपणे चोरटी वाहतूक होत आहे.

अशात वाळू लिलावालाही प्रतिसाद नसत्याने वाळूतस्करांचे चांगभले होत तहसीलदार शीतल राजपूत, शिरसोलीच्या मंडळ अधिकारी सारिका दुडि व कानळदा येथील छाया कोळी यांच्या पथकाने दोन ट्रॅक्टर, तर नायब तहसीलदार राहुल वाघ, जळगाव शहरचे मंडळ अधिकारी राजेश भंगाळे व भोलाणेचे ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत ठाणगे यांच्या पथकाने हायवा ट्रक जप्त केला. ही वाहने प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.

वर्षभरात १०८ वाहनांवर कारवाई

याशिवाय, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान तहसील कार्यालयाच्या पथकाकडून १०८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती व सहभाग वाढविण्यात आला आहे. या समित्यांच्या बैठका घेऊन सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाळुचोरांविरुद्ध भारतीय दंडसंहिता १०७, १०८ व ११० नुसार प्रतिबंधात्क कारवाईह केली आहे. यापुढेही नेमून दिलेल्या पथकामार्फत तसेच तहसील कार्यालयाच्या पथकामार्फत छापे टाकून कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार राजपूत यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment