---Advertisement---

Weather update : जळगावसह राज्यभरात तापमानात घट, थंडीचा कडाका वाढणार !

---Advertisement---

जळगाव ।  राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होत असून आज सोमवारपासून (दि. ३० डिसेंबर) थंडीचा कडाका वाढणार आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ झाली होती, आणि थंडी कमी जाणवत होती. त्यात अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने वातावरण थोडेसे अनियमित झाले होते. मात्र आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यात जळगाव व इतर भागांत रात्रीचे किमान तापमान १९ अंशांपर्यंत पोहोचले होते, तर दिवसाचे कमाल तापमान ३० अंशांपर्यंत वाढले होते. मात्र रविवारी (दि. २९) किमान तापमान १६.८ अंशांपर्यंत घसरले, आणि कमाल तापमानही २७.४ अंशांपर्यंत खाली आले. यामुळे रात्रीच्या वेळी थंड वाऱ्याचा चांगलाच अनुभव नागरिकांना येऊ लागला.

हिमवृष्टीमुळे थंडीची लाट

उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, कुलू-मनाली, आणि उत्तराखंड भागांत सध्या हिमवृष्टी सुरू आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर देखील होणार असून थर्टी फर्स्टच्या रात्रीपासून थंडीचा कडाका वाढेल, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

नागरिकांनी घ्यावी काळजी

थंडीच्या वाढत्या लाटेमुळे नागरिकांनी उबदार कपडे, गरम पेये यांचा अधिकाधिक वापर करून स्वतःची काळजी घ्यावी. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने अधिक सजग राहावे, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment