तरुण भारत लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । भुसावळ शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर बंद असलेल्या फेकरी टोल नाक्यानजीक वरणगावकडून भुसावळकडे येत असलेल्या २० वर्षीय तरुणाच्या दुचाकीला समोरून येणार्या भरधाव चारचाकीने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला.
यश वाणी (वय 20) असे मयत तरुणाचे नाव आहे. वाणी हा युवक भुसावळ शहरातील व्ही.एम. वॉर्डातील रहिवासी होता. तो वरणगावकडून भुसावळकडे दुचाकीने येत असताना समोरून येणार्या कारने दुचाकीला उडवल्याने यशचा जागीच मृत्यू झाला तर शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. यश हा कुटुंबातील एकमेव मुलगा असल्याने अपघाताचे वृत्त कळताच कुटुंबांने टाहो फोडला.
मयत यशच्या पश्चात आई-वडिल, बहिण असा परीवार आहे. यश हा जळगाव येथे इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाताचे वृत्त कळताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, देवा वाणी यांनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघाताला कारणीभूत वाहनाची धडक इतकी जोरदार होते की त्यात यशच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले.