मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. झाडांना पाणी देणारे टँकर आणि कर यांचा हा भीषण अपघात झाला असून यात जळगावातील विवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टर चालक याचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील दाम्पत्य अमरावती येथून काम आटपून घरी परतत असतांना मुर्तीजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातादरम्यान झाडांना पाणी देणारा टँकर उभा असताना भरधाव वेगात येणारी कार टँकरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता कि, जळगाव येथील कल्पना पराग लिमये, वय ५६ यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती पराग नागेश लिमये वय ५७ हे गंभीर जखमी झाले आहे. तसेच या अपघातात ट्रॅक्टर चालक सुनील ठाकरे (वय-४८) याचाही जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव चे रहिवाशी असलेले लिमये दाम्पत्य हे अमरावती येथून १६ मार्च रोजी दुपारी काम आटवून जळगावकडे परत जात होते. दुपारीच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील कुरूमनजवळील रस्त्यावर झाडांना पाणी देण्यासाठी उभे असलेल्या ट्रॅक्टरच्या टँकरला कार क्रमांक (एमएच १९ बीजे ३९८१) ने जोरदार धडक दिली. या अपघातात कल्पना लिमये यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पराग लिमये यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
गंभीर दुखापत असल्याने पराग यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात आपघातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.