The case of MassaJog: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन

मुंबई : मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या तपास नेतृत्वाची जबाबदारी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली यांच्यावर देण्यात आली आहे, तसेच या पथकात 10 सदस्यांची टीम नियुक्त केली आहे. यामुळे हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग येणार असून आरोपींचा कसून शोध घेण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ६३७/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच, संतोष देशमुख हत्येप्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

गृह विभागाने परिपत्रकाद्वारे एसआयटीच्या स्थापनेसंबंधी माहिती दिली असून, या पथकात विविध पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती केली जाईल. त्याचबरोबर, एसआयटीच्या तपासातून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गडबडीच्या मागे असलेल्या घटनांची उकल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

10 जणांची SIT टीम

आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक

अनिल गुजर – पो. उप अधीक्षक

विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक

महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक

आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक

तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक

मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार/१३

चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक /१८२६

बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक/१६७३

संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई/४७१