जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पखवड़ा’ अभियान राबविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या अभियानांतर्गत स्वच्छता अभियान शहरात भारतीय जनता पार्टी आणि सामाजिक संघटना, अध्यात्मिक केंद्रे, शैक्षणिक संस्था यांच्यातर्फे रविवारी सकाळी राबविण्यात आले. स्वच्छता अभियानात रेल्वे स्टेशन, फुले माकेॅट आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली. या अभियानात खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
भाजपतर्फे शहरात स्वच्छता, खासदार उन्मेश पाटील यांचाही सहभाग
भारतीय जनता पक्षाच्या जळगाव महानगरतर्फे रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पखवड़ा’ अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजप जळगाव महानगरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पखवड़ा’ साजरा केला जात आहे. या अनुषंगाने तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान रेल्वे स्टेशन परिसरात राबविण्यात आले. यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे, लोकसभा क्षेत्रप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रेल्वे स्टेशन परिसरात मान्यवरांनी स्वच्छता करीत परिसर झाडून काढला. याप्रसंगी विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, स्वच्छता अभियानाचे प्रमुख राहुल वाघ, महिला प्रदेश सचिव रेखाताई वर्मा यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा, आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.