महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा 

जळगाव  :  जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्हातर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं होते. या मेळाव्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर  व अभिजीत पानसे मुंबई यांनी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे निस्वार्थी मनाने पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काम करून रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा येथील दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन नेत्यांनी केले. याप्रसंगी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्मिता वाघ,जळगाव शहर विधानसभेचे आमदार सुरेश भोळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, भारतीय जनता पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपचे माजी उपमहापौर सुनील खडके, नाशिकचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, अनिल वाघ, कमलाकर घारू, मुकुंदा रोटे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, राहुल काळे, प्रज्वल चव्हाण, निलेश बारी, जनहित कक्षाचे चेतन आढळकर, मुक्ताईनगरचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई,  एरंडोलचे तालुकाध्यक्ष, विशाल सोनार आदी उपस्थित होते.

यांनी केला मनसेत प्रवेश 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कुणाल पवार, मेसेज सपकाळे उपमहानगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाने आदेश सोनवणे ,हिमांशू मोरे, राहुल सोनवणे, भूषण साबळे, भावेश सपकाळे, अर्जुन शर्मा, भोजराज पवार, उदय निसाळकर, सुमित सपकाळे, चिराग सपकाळे, ललित धोरे, योगेश टिळवणे, कल्पेश ठाकूर, विशाल पाटील, सोनू राजपूत, पियुष राजपूत, विश्व सपकाळे, प्रणव ठाकूर, वैभव पाटील, गोलू पाटील, राहुल पाटील, सोमेश कुंभार, प्रसाद पाटील, विष्णू कोळी, समाधान कोळी यांनी प्रवेश केला.

मेळाव्याचे आयोजन जळगाव शहर मनसेतर्फे करण्यात आले होते. यस्वीतेसाठी मनसेचे जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, कुणाल पवार, साजन पाटील, विकास पाथरे, महेश माळी, संदीप मांडोळे, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, योगेश चव्हाण, विशाल शिंदे, विशाल जाधव, अक्षय लहाने, ओम राय, पवन गायकवाड, स्वामी लहाने, राज मेंगडे, भुषन पाटील, महेंद्र सोनावणे, सागर पाटील, विवेक तायडे, विशाल मोरे, रवींद्र सोनी, माणिक सोनवणे, भागवत पवार, सखाराम पाटील, हरी ओम राजू डोंगरे निलेश परदेशी इस्माईल खाटीक कमलेश डांबरे यांनी कामकाज पहिले. निर्धार मेळाव्याचे सूत्रसंचालन जळगाव शहराचे सचिव जितेंद्र पाटील, जनहित संघटनेचे राजेंद्र निकम यांनी केले.  आभार उपशहर अध्यक्ष आशीष सपकाळ यांनी मानले.