---Advertisement---

गोव्यात फडकला सनातन धर्माचा ध्वज

by team
---Advertisement---

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या हस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात करण्यात आले. यावेळी डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या संतांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. ‘सनातन धर्माचा ध्वजा’चे वैशिष्ट्य : प्रत्येक मंदिरात जशी ध्वजस्थापना होते, तसे सनातन राष्ट्राशी संबंधित ‘सनातन धर्मध्वजा’चे आरोहण करण्यात आले. हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. हा ‘धर्मध्वज’ आहे.

‘सनातन हिंदू राष्ट्राची स्थापना’ या ध्येयाची विश्वाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या हिंदूंना हा ध्वज जाणीव करून देईल. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहे; म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके मानली जातात.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment