नवरा शरीर संबंधास नकार द्यायचा, सासू नवरा बायकोच्यामध्ये झोपायची; कारण ऐकून बायको झाली थक्क….!

---Advertisement---

 

मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याने दोघांच्यामध्ये उशी ठेवली, पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी नकार दिला. मात्र या नकाराचं कारण जेव्हा पत्नीला कळलं तेव्हा ती गोंधळली.

देशात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून रोज वेगवेगळ्या घटना ह्या आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. अशातच एक पुन्हा धक्कादायक घटना समोर आली असून ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील आहे.

एका विवाहित महिलेने तिच्या पतविरुद्ध गंभीर आरोप केले असून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सदर पीडित विवाहित महिलेचा पतीच्या दोन्ही किडन्या ह्या निकामी असल्याची माहिती सासरच्या कुटुंबीयांनी लपवून तिच्याशी विवाह केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र एवढेच नाही तर लग्नानंतर पती वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. यासह माहेरच्यांकडून उपचारासाठी 30 लाख रुपये ची मागणी नाहीतर तुझी किडनी दे अशी मागणी देखील पती करत असल्याचा दावा पीडित विवाहित महिलेने केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातल्या चकेरी भागात पीडित महिलेचा विवाह हा 22 जून 2023 रोजी लखनऊच्या निशांत कुमार यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर पती सतत आरोग्याच्या कारणास्तव पत्नीपासून दूर राहत होता व झोपताना दोघांमध्ये उशी ठेवत होता काही वेळा तर सासूही पती-पत्नींमध्ये झोपत असल्याचं पीडित महिलेने सांगितला आहे. पतीच्या अशा वर्तनामुळे संशय वाढल्यानंतर महिलेने या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली.

काही महिने उलटल्यानंतर पीडित विवाहित महिलेच्या हाती तिच्या पतीची हॉस्पिटलची फाईल लागली. त्यामध्ये तिने चौकशी केली असता तिच्या पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं व तो डायलिसिस वर असल्याचं स्पष्टपणे उघड झालं. जेव्हा ही बाप समोर आली तेव्हा पत्नीने पतीला जाब विचारला असता पतीने तिला निर्लज्जपणे किडनी दान करण्याची मागणी केली तसंच तुझ्या माहेरून 30 लाख रुपये उपचारासाठी आणण्याचा दबाव देखील टाकला.

याशिवाय सदर पिढीतेचा पती हा आधीपासून विवाहित असल्याचा तसेच त्याला मुलगी असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या सर्व संतप्त प्रकारामुळे महिलेने चकेरी पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे व ननंद यांच्याविरुद्ध फसवणूक आणि हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

एसीपी अभिषेक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---