मोठी बातमी! बोगस कॉल सेंटर हाताळणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात सापडला

---Advertisement---

 

जळगाव : जळगावातील एल. के. फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अखेर बोगस कॉल सेंटर हाताळणारा मुख्य सूत्रधारला पोलिसांनी अटक केली आहे. आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांना मुंबई येथून करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता १० झाली आहे.

जळगावातील एल. के. फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल होऊन आठ जणांना अटक करण्यात आले होते. ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहे.

ललित कोल्हेंशी ओळख कशी झाली?

आदील व अकबर या दोघांना शनिवारी (२२ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी अटक केलेल्या इम्रानला एक लाख रुपये दिल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले.

त्याला ही रक्कम कशी दिली, कॉल केल्यानंतर 3 समोरील व्यक्तीशी बोलण्याची स्क्रिप्ट कशी व कोठून मिळविली, आंतरराष्ट्रीय रॅकेट कसे काम करायचे, दोघांची ललित कोल्हेंशी ओळख कशी झाली, याची माहिती घ्यायची असल्याचे न्यायालयासमोर सांगून गणापुरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली.

आंतरराष्ट्रीय रॅकेटची कार्यपद्धती येणार समोर

हे कॉल सेंटर हाताळणारेच दोघे अटक झाल्याने फसवणुकीची रक्कम कोणाच्या बँक खात्यावर स्वीकारली जात होती, यासह विदेशात त्यांचे हस्तक कोण आहे याचीही माहिती समोर येऊ शकते. विदेशातील नागरिकांना फसविण्याची कार्यपद्धती कशी होती, ही महत्त्वाची माहिती समजण्यासह इतरही केंद्रांमार्फत फसवणूक केली आहे का, हेदेखील स्पष्ट होऊ शकणार आहे. अटक केलेल्या आदील याच्यावर या पूर्वीही मुंबईत आयटी अॅक्टनुसार, तर अकबर याच्यासह दंगल व इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---