---Advertisement---

माहेरी आली अन् नवविवाहिता प्रियकरासोबत….

---Advertisement---

---Advertisement---

माहेरी आलेली नवविवाहित वधू अचानक गायब झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. तीने तिच्या सासरी आपल्याला रक्षाबंधनाला आईवडिलांच्या घरी जायचे असल्याचे सांगतिले. सासरकडील मंडळींनी देखील कोणतीही आडकाठी न टाकता तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. परंतु, त्यांना ती पुढे काय करेल याची कल्पना नव्हती. तिने माहेर गाठताच तिच्या प्रियकरासोबत पळ काढला.

मुलगी बेपता होताच तिच्या माहेरकडील मंडळींनी तिचा शोध सुरु केला. परंतु, त्यांना तिचा कोणताही ठावठिकाणा मिळून आला नाही. यावेळी त्यांच्या मनात ती तिच्या प्रियकरासोबत पळून तर गेली नाही ना ? अशी शंका निर्माण झाली. यावेळी चौकशी केली असता तिचा प्रियकर ही बेपत्ता असल्याचे समोर आले. तेव्हा त्यांच्या संशय हा पक्क्या निर्णयात बदलला. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की त्याच मुलाने त्यांच्या मुलीला धमकावून तिला आपल्यासोबत घेऊन गेले आहे. कारण तो मुलगा तिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होता.

---Advertisement---

पोलिसांनी कुटुंबांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरु केला आहे. बेपत्ता मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले: आमच्या घराजवळील पोस्ट ऑफिसच्या गल्लीत एक तरुण राहतो. तो आमच्या मुलीच्या मागे लागला होता. तो तिला दररोज त्रास द्यायचा. मग आम्ही आमच्या मुलीचे लग्न दुसरीकडे लावले. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, २३ जुलै रोजी घरातील सर्व लोक काही कामासाठी बाहेर गेले होते आणि तेव्हापासून त्यांची मुलगी बेपत्ता आहे.


लग्नापूर्वी हा तरुण त्यांच्या मुलीसोबत अनेकदा दिसला होता. यावर या मुलीने तिच्या कुटुंबाला सांगितले होते की, तो तरुण अनेकदा तिला बाहेर त्रास देतो. कुटुंबातील सदस्य स्पष्टपणे सांगतात की त्याच मुलाने तिला पुन्हा धमकावले आहे आणि तिला सोबत घेऊन गेला आहे. मुलीच्या सासरकडील मंडळींना ही माहिती देण्यास कुटुंबातील सदस्य घाबरत आहेत. ते म्हणतात की त्याच्या मुलीचे एक घर उद्ध्वस्त होईल.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, मुलगी तिच्या आईवडिलांच्या घरी आल्यापासून तो तरुण सतत तिला भेटण्याची विनंती करत होता. मुलीने हे तिच्या आईला सांगितले होते. मुलीची आई म्हणाली- माझ्या मुलीने मला फोनवर सांगितले की तो मुलगा तिला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की लग्नापूर्वी मुलीचे त्या मुलाशी चांगले संबंध (प्रेमसंबंध) होते. गावातील सर्वांना हे माहित होते. पण मुलीच्या कुटुंबाला तो आवडला नाही. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बिल्होर परिसरात घडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment