---Advertisement---
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांचे निकाल हाती आले आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, वरणगाव, शेंदुर्णी, पाचोरा, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव, एरंडोल आणि यावलचा समावेश असून, कोणती नगर परिषद कोणी काबीज केली आहे, हे जाणून घेऊयात.
पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे पाचोरा नगरपरिषद शिवसेनेने काबिज केली असून, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तर भाजपच्या उमेदवार व माजी आमदार दिलीप वाघ यांची पत्नी सुचेता वाघ या पराभूत झाल्या आहेत.
मुक्ताईनगर, पारोळा, भडगावातही शिवसेना शिंदे गटाचा जलवा
पारोळामध्ये नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे. भडगावमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाने झेंडा फडकवला असून, नगराध्यक्षापदी रेखा मालचे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर नगरसेवकच्या शिवसेना शिंदे गटाने 19, भाजप 4, इतर 1 जागा जिंकल्या आहेत.
मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठी धक्का बसला असून, नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील यांचा 2561 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह सासरे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भुसावळ
नगराध्यक्षा – तुतारी – गायत्री भंगाळे
वरणगाव
नगराध्यक्ष – अपक्ष – सुनील काळे
शेंदुर्णी
नगराध्यक्ष – भाजप – गोविंद शेठ अग्रवाल
एरंडोल
– नगराध्यक्ष – भाजप डॉ. नरेंद्र पाटील
चाळीसगाव
नगराध्यक्षा – भाजप – प्रतिभा चव्हाण
यावल
– नगराध्यक्षा – उ. बा. ठा गटाच्या छाया अतुल पाटील
जामनेर पालिकेत विरोधकांची एन्ट्री
जामनेरमध्ये भाजपाने सत्तावीस पैकी 23 प्रभागात बहुमत सिद्ध करून मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मिळवलेल्या या विजयाचा जल्लोष शहरातून साजरा होत आहे. विशेषतः जामनेर नगरपालिकेचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चार उमेदवार विजयी झाल्याने पालिकेत विरोधकांची एन्ट्री झाली आहे.








