---Advertisement---
जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
जळगाव महापालिकेत शिंदेसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांच्या पाठोपाठ प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ मधून मनोज चौधरी बिनविरोध झाले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राहुल लोखंडे यांनी माघार घेतल्याने चौधरी हे बिनविरोध झाले आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही बिनविरोध झालेल्या उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, प्रभाग क्रमांक 18-अ मधून उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
दरम्यान, चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.









