---Advertisement---
तळोदा : तळोदा नगरपालिकेच्या तिरंगी लढतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, या यशाबद्दल अजित पवारांनी मुंबई येथे विशेष अभिनंद समारंभ आयोजित करून लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक करत तळोद्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
तळोदा नगरपालिकेच्या निवणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार आणि भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यसह आमदारांनी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. मात्र, या सर्व प्रयत्नांवर अजित पवारांच्या उमेदवाराने पाणी फेरले आणि दणदणीत विजय मिळवला. विशेषतः यामुळे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
अन् एका दिवसात उभं केलं संपूर्ण पॅनल
विशेष म्हणजे भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत संपूर्ण पॅनल उभा करण्यात आला. या पॅनलने नगराध्यशांसह तब्बल ११ नगरसेवक निवडून आंत स्पष्ट बहुमत मिळवले आणि तळोदा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.
तळोद्याच्या सर्वांगीणविकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!
या यशाबद्दल अजित पवारांनी मुंबई येथे विशेष अभिनंद समारंभ आयोजित करून लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक करत तळोद्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.









