---Advertisement---
जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने प्रवाश्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशात एकाचवेळी तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आहे. त्यामुळे अशा नुकसानीच्या घटना टाळण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
निखिल राजु मानके (वय २०, रा. धानवड) हा शिक्षण घेत असून, तो नवीन बसस्थानकात गावी जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत उभा होता. जामनेर बस लागल्यानंतर तो दरवाजातून चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्याच्याकडील सुमारे साडेआठ हजार रुपये किमीचा मोबाईल चोरुन पोबारा केला. मोबाइल लंपास झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने शोध घेतला असता तपास लागला नाही. याप्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस हवालदार अलका शिंदे तपास करीत आहेत.
मयूर मांगु पाटील (वय २०, रा. चिंचखेडा बु.) हा तरुणही शिक्षण घेत असून, तो नवीन बसस्थानकात थांबला होता. संध्याकाळी जामनेर बसमध्ये चढत असताना गर्दीच्या माहोलमध्ये चोरट्याने सुमारे साडेसहा हजार रुपये किमतीचा त्याचा मोबाईल चोरुन नेला. तरुणाने बस तसेच परिसरात शोध घेतला मात्र मोबाईल मिळुन आला नाही. याप्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार प्रदीप पाटील हे तपास करीत आहेत.
२४ वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून, ती पाचोरा येथे वास्तव्य करते. ती नवीन बसस्थानकावर बससाठी थांबली होती. चाळीसगाव बसमध्ये ही तरुणी चढली असता गर्दीचा फायदा घेत चोरट्याने सात हजार किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









