---Advertisement---

Forbes : फोर्ब्सच्या 100 महिलांमध्ये भारताच्या ‘या’ तिघींचा समावेश

by team
---Advertisement---

Forbes :फोर्ब्सच्या जगभरातील 100 सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली महिलांच्या यादीत भारताच्या तीन महिलांनी त्यांचे स्थान अबाधित ठेवले आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आणि दोन भारतीय उद्योजिकांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या या यादीत केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारमण, रोशनी नाडर मल्होत्रा, आणि किरण मुजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.

निर्मला सीतारमण :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना यादीत 28 व्या स्थानावर स्थान मिळाले आहे. मे 2019 मध्ये भारताच्या अर्थमंत्री म्हणून नियुक्त झाल्या होत्या. त्या भारताच्या 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या जबाबदारीत असून, भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. गेल्यावर्षी त्या 32 व्या स्थानावर होत्या आणि यावर्षी त्यांनी 4 स्थानांची वाढ केली आहे.

रोशनी नाडर मल्होत्रा : HCL टेक्नोलॉजीजच्या सीईओ म्हणून कार्यरत रोशनी नाडर मल्होत्रा या यादीत 81 व्या स्थानावर आहेत. त्या HCL चे संस्थापक आणि उद्योगपती  शिव नाडर यांची मुलगी आहेत. 2020 मध्ये त्यांनी वडिलांकडून HCL चे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी पत्रकारिता आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

किरण मुजुमदार-शॉ : बायोकॉन कंपनीच्या संस्थापिका किरण मुजुमदार-शॉ यांना फोर्ब्सच्या यादीत 82 व्या स्थानावर स्थान मिळाले आहे. त्या भारतातील त्या 91 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती असलेल्या किरण मुजुमदार-शॉ यांनी 1978 मध्ये बायोफार्मास्युटिकल फर्म बायोकॉनची स्थापना केली. त्यांची कंपनी मलेशियात इन्सुलिनचे उत्पादन करते. कोरोना महामारीच्या काळात औषध निर्मितीसाठी त्यांच्या कंपनीने मोठे योगदान दिले.

ही यादी व्यवसाय, मनोरंजन, राजकारण, आणि इतर विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करते, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे आणि समाजावर प्रभाव टाकला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment