---Advertisement---

मालवाहू वाहनातून ४ लाखांचे सिगारेट पाकिटांचे बॉक्स घेत चोरटे फरार

---Advertisement---

मालवाहू महेंद्र वाहनाचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा कापुन चोरट्यांनी सुमारे चार लाख दोन हजार रुपये किमतीचे विविध सिगारेट पाकीटांचे बॉक्स चोरुन नेले. शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ खासगी जागेत ही घटना घडली. शनिवारी (२७ जून) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

माजी महापौर नितीन लड्डा आणि चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०, रा. नवीपेठ) यांच्या मालकीची गोविंदा रिक्षास्टॉपजवळ खासगी जागा आहे. राका हे पान मसाला व्यावसायिक आहेत. या मालाचा ऑर्डरनुसार सप्लाय केला जातो. यासाठी त्यांच्या मालकीची महेंद्र (एमएच १८ सीवाय०१२३) या मालवाहू वाहनाचा वापर ते करतात. या वाहनात सप्लायचा माल होता.

हे मालवाहू वाहन गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ खासगी जागेत त्यांनी उभे केले. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी या वाहनाला लक्ष्य केले. वाहनाचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा कापून चोरट्यांनी विविध सिगारेट पाकीटाचे खोके चोरुन नेले. ६ हजार ३०० रुपये किमतीचे एच १० सिगारेट १ हजार ५०० पाकीट, सहा हजार किमतीचे आईस बस्ट सिगारेट ४० पाकीट ४ हजार ६८० रुपये किमतीचे क्लो क्रशचे ६० सिगारेट पाकीट, १० हजार ७०० रुपये किमतीचे कुल सिगारेटचे २०० पाकीट, ३४ हजार किमतीचे गोल्ड फ्लॅक, पान इंडीर्मिट सिगारेटचे ४०० पाकीट, २ लाख ७२ हजार किमतीचे गोल्ड फ्लॅक बटन मिंट स्विच सिगारेटचे ३ हजार २०० पाकीट, ३ हजार ६० रुपये किमतीचे गोल्ड फ्लॅक लाईट सिगारेट २० पाकीटे, ३४ हजार किमतीचे गोल्ड फ्लॅक प्रिमीअम सिगारेट ४०० पाकीट, ४ हजार २५० रुपये किमतीचे गोल्ड फ्लॅक फ्रेश मिंट सिगारेट ५० पाकीट, ६ हजार २४० रुपये किमतीचे मालब्रो सिगारेट ४० पाकीट, ३ हजार १२० रुपये किमतीचे मालब्रो क्लो मिक्स सिगारेटचे २० पाकीटे, १५ हजार ८७५ रुपये किमतीचे ब्रिस्ट्राल सिगारेट २५० पाकिटे, १ हजार ८५० रुपये किमतीचे शिफ्ट ड्यूस सिगारेट दहा पाकिटे असा एकूण चार लाख २ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी जावून प्रकार जाणुन घेतला. हवालदार सुनील पाटील हे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---