बोरद येथे सात मोबाईलसह रोकड घेऊन चोरटे पसार


तळोदा : तालुक्यातील बोरद येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानासह हॉटेल फोडले त्यातूून सात मोबाईल तेहतीस हजारांच्या ऐवज लंपास केल्याची घटना घडली याप्रकरणी अनोळखी विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बोरद येथील लाखापूर रस्त्यालगत व फॉरेस्ट नाक्याजवळ सुनील कैलास मोरे यांची महालक्ष्मी मोबाईल चे दुकान आहे. या दुकानाचे पत्रे वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. दुकानातून बारा हजार किमतीचे दोन मोबाईल, चार हजाराच्या एक मोबाईल , तीन हजाराचे दोन मोबाईल, नऊ हजाराचे दोन मोबाईल असे सात मोबाईल लांबविले आहे.

---Advertisement---

 

या दुकानाशेजारी असलेल्या जितेंद्र राजेंद्र पाटील यांच्या नागाई नास्ता हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये देखील चोरी केली. या हॉटेलचे पत्रे उचकवून चोरट्याने गल्ल्यातून साडेपाच ह हजाराची रोकड लांबवली आहे. मोबाईल दुकान व हॉटेल मधून एकूण 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. याबाबत सुनील कैलास मोरे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बोरद दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल भीमसिंग ठाकरे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---