---Advertisement---

अमळनेरात पार्किंग केलेली दुचाकी चोरट्यानी पळवली ; अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

अमळनेर  : येथील  न्यायालयाच्या आवारातून एका व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवार 29 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी मंगळवार  30 एप्रिल रोजी अंमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  रहीम रमजान तेली (वय 48,  रा. गांधीनगर अमळनेर)  हे आपल्या परिवारासह राहतात.  ते व्यापारी आहेत. सोमवार 29 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अमळनेर न्यायालयात दुचाकी क्रमांक एमएच 10 क्यू 4951 ने आलेले होते.  त्यावेळी त्यांनी दुचाकी न्यायालयाच्या आवारात पार्किंग केली होती. दुचाकी चोर यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली.  दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला.  परंतु, दुचाकी कुठेही मिळून आली नाही.  अखेर मंगळवार 30 एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment