---Advertisement---

Jalgaon News : वाहन शोरूममध्ये चोरट्यांचा हैदोस, लाखोंचे नुकसान

by team
---Advertisement---

जळगाव : शहरातील वाहन शोरूममध्ये रविवारी (दि. 2) मध्यरात्री चोरट्यांनी जबरदस्त तोडफोड करत लाखो रुपयांचे नुकसान केले. मात्र, त्यांना रोख रक्कम मिळाली नाही किंवा फारशी मोठी चोरी करण्यात यश आले नाही. या घटनेमुळे शहरातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी दोन शोरूममध्ये उडवली धामधूम

जळगाव-भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्याजवळ असलेल्या चौधरी टोयोटा या चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये चोरटे मध्यरात्री शिरले. त्यांनी शोरूमच्या डिलिव्हरी सेक्शनमधील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. सुमारे दोन तास संपूर्ण शोरूममध्ये शोधाशोध करूनही मोठी रोकड मिळाली नाही. त्यांना केवळ 10 ते 11 हजार रुपये हाती लागले. मात्र, त्यांनी लॉकर, ड्रॉवर, कॅबिनेट आणि इतर वस्तूंची मोठी नासधूस केली, ज्यामुळे शोरूमचे मोठे नुकसान झाले.

या घटनेनंतर चोरट्यांनी लगेचच सातपुडा ऑटोमोबाईल्स या अन्य शोरूममध्ये प्रवेश केला. येथेही त्यांना काही मिळाले नाही, पण त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. चोरटे येथे चार तास थांबले होते.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

या दोन्ही घटनांचा संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चौधरी टोयोटा शोरूममध्ये चोरटे रात्री 12 वाजता शिरले आणि पहाटे 2 वाजता बाहेर पडले. त्यानंतर सातपुडा ऑटोमोबाईल्स मध्ये चोरट्यांनी चार वाजेपर्यंत धुमाकूळ घातला. 

पोलीस तपास सुरू

हे. पोलिसांनी दोन्ही शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. परंतु, या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment