---Advertisement---

Accident News: वेगवान वाळू डंपरची धडक; तीन म्हशींचा बळी

by team
---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात अनेक भागात वाळूची अवैध वाहतूक सुरु आहे. अशा प्रकारे भडगाव शहरात वाहतूक करत असताना अपघात झाल्याचे प्रकार घडत असतात. भडगाव-वाक रस्त्यावर वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिल्याने तीन म्हशी ठार तर एक म्हशीला गंभीर मार लागला आहे. हि घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी चारण्यासाठी शेतात घेऊन जात असतात. अशाच प्रकारे आज म्हशींना चारण्यासाठी नेत भडगाव – वाक रस्त्यावर जुना महिदंळे रस्त्याच्या अली‌कडे विटभट्टी जवळ वाककडुन भडगावकडे येणारा डंपर (एमएच ४३ -बीपी ७८४२) ने समोरून येणाऱ्या म्हशींना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात चार म्हशी पैकी तिन म्हशी जागेवर ठार तर एक म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे.

धडकेची तीव्रता एवढी जोरदार होती की, चार पैकी तीन म्हशी जागीच मृत्युमुखी पडून चक्क डंपरच्या खाली अडकल्या होत्या. त्यांना जेसीबीच्या साह्याने डंपरच्या साहाय्याने ओढुन काढव्या लागल्या. म्हशीना धडक देणारे डंपर तालुक्यातील वाक येथील असल्याचे बोललं  जात आहे.

यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होता. घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. म्हशींना धडक देणारा डंपर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा व भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होता. धडक देणारा डंपर सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी थांबुन असल्याचे दिसून आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment