अंबरनाथ : शिर्डीला साईदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या अपघातात १० जण मृत्युमुखी पडले असून एकाच गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना असून एकाच वेळी गावातील तब्बल १० जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण आहे.
अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जात असून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली.
मृतांची नावे
१) प्रमिला प्रकाश गोंधळी, वय ४५, २) वैशाली नरेश उबाळे, वय ३२, ३) श्रावणी सुहास बारस्कर, वय ३०, ४) श्रध्दा सुहास बारस्कर, वय ४ ५) नरेश मनोहर उबाळे, वय-३८ या सर्व रा. अंबरनाथ 6)बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५ (ड्रायव्हर) ७) दिक्षा संतोष गोंधळी, वय १८ रा. कल्याण 8)आयुष्मान ऊर्फ साई प्रशांत महंती, वय-५ वर्ष ९) रोशनी राजेश वाडेकर, वय – ३०
तर, या भीषण अपघातात निधी उभळे, माया जाधव, प्रशांत मोहंसी, सिमा नेके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, धनिषा वाडेकर, शिवण्या बवस्कर, आशा जयस्वाल, योगिता वाडेकर, योगीता वाडेकर, रंजना वोटले, सुप्रिया साहिल, ऋतीका रौंधळ, वषीराणी बेहरा, सुहास बवस्कर जखमी झाले आहेत. या सर्वांवर सिन्नर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात वर्षाराणी बेहरा वय – 31, योगिता संदेश वाडेकर वय – ३०, मयुरी महेश बाइत वय – 23, श्रुतिका संतोष गोंधळी वय – 42 आणि रंजन प्रभाकर पोटले वय – ४० हे गंभीर जखमी झाले असून, या सर्वांवर सिन्नर येथील यशवंत हॉस्पिलमध्ये उपचार सुरू आहेत.