जळगाव : हावडा एक्स्प्रेसला टायमर बाँम्ब लावून उडवून लावण्याची धमकी रेल्वे पोलिसांना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या ट्विटमध्ये मुंबई हावडा एक्सप्रेस ट्रेन या गाडीत टायमर बॉम्ब असून नाशिक रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी मिळताच जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस, जळगाव पोलीस दल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव स्थानकावर मुंबई हावडा गाडीची दोन तास तपासणी केली. तपासणी कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून न आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे .
मुंबई-हावडा एक्स्प्रेस मेल गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हा धमकीचा मॅसेज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ऑफ कंट्रोल ऑफिसला आला होता. हा मॅसेज मिळताच जळगाव रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबविण्यात आली. यानंतर तिची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू मिळून आली नाही. यानंतर ही ट्रेन पुढे पाठविण्यात आली.
रेल्वे विभागाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन मुंबई हावडा एक्स्प्रेस मेलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. यात मुंबईकडे जाणारी गाडी क्र. 12809 हावडा – मुंबई मेल या गाडीत नाशिक येण्यापूर्वीच टायमर बॉम्बद्वारे मोठा बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली.
धमकी मिळताच जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवत तपासणी करण्यात आली. पहाटे 4:17 मिनिटांनी रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्बाची तपासणी करण्यात आली. त्यात काही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने रेल्वे गाडी 6 वाजून 28 मिनिटांनी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली. Fazluddin Nirban या नावाच्या ट्विटर अकाउंट वरून रेल्वेत विभागाला धमकीचा मेसेज आला होता. याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु कऱण्यात आला आहे.