---Advertisement---

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ ! ग्राहकांचे बजेट कोलमडले, जळगाव सराफ बाजारात आजचे भाव ?

by team
---Advertisement---

आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना आणखी आर्थिक फटका बसला आहे. गत सप्ताहात देखील सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी, चलनवाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. पुढील काही आठवड्यांतही सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आज सोमवारी (२४ फेब्रुवारी) सोन्याचे दर पुन्हा वधारले, ज्यामुळे सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. चला जाणून घेऊया आजचे सराफ बाजरातील आजचे दर.

हेही वाचा : Crime News: वाद मिटवण्यासाठी पत्नीला भेटायला बोलावलं अन् नवऱ्याच्या थरारक कृत्याने सर्वांना हादरवलं

सोन्याच्या किमतीत वाढ

सोमवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली असून ते ८८,०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव ८०,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे.

आजचे ताजे सोन्याचे दर (२४ फेब्रुवारी २०२५)

२२ कॅरेट सोन्याचा भाव:

  • १ ग्रॅम – ₹८,०६९
  • १० ग्रॅम (१ तोळा) – ₹८०,६९०

२४ कॅरेट सोन्याचा भाव:

  • १ ग्रॅम – ₹८,८०२
  • १० ग्रॅम – ₹८८,०२०

विविध शहरांमधील सोन्याचे दर

सोन्याचे दर शहरानुसार वेगळे असतात. काही महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत –

शहर२२ कॅरेट (₹/10 ग्रॅम)२४ कॅरेट (₹/10 ग्रॅम)
मुंबई८०,५५०८७,८७०
पुणे८०,५५०८७,८७०
जळगाव८०,५५०८७,८७०

सोने महागण्याचे कारण काय?

विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारातील घडामोडी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण आणि गुंतवणूकदारांचा सोन्यात वाढता कल यामुळे किंमतीत वाढ होत आहे. चलनवाढीमुळेही सोने महाग झाले आहे. पुढील काही आठवड्यांत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment