---Advertisement---
Sangli Crime News: कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरातील सरकारी घाटावर घडली आहे. रविवारी (ता. २३) रात्री ही घटना घडली असून खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दोघांनाही मुलगा-मुलगी आहे
याबाबत अधिक माहिती अशी, प्रियांका जाकाप्पा चव्हाण रा. सांगलीवाडी असे मयत महिलेचे नाव आहे. तर जाकाप्पा सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रियांका आणि जकाप्पा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह होता. ते बबलेश्वर येथे राहत होते. जकाप्पा हा एका दगडाच्या खाणीवर काम असे. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे या वादातून प्रियांका ही सांगलीवाडी येथे माहेरी आली होती. ती आई-भावाबरोबर राहत होती. तसेच टिळक चौकातील एका साडी सेंटरमध्ये ती काम करत होती.
काल पती जकाप्पा हा तिला भेटायला आला होता. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास काम आटोपल्यानंतर प्रियांका घरी जाण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा पती जकाप्पा याने तिला गाठले. तिला बोलण्यासाठी म्हणून सरकारी घाटावर आणले. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर जकाप्पा याने तिच्या गळ्यावर चाकूने खोलवर वार केला. ती गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर तो तिथून पळून गेला.
प्रियांका घरी आली नाही म्हणून तिची आई व भाऊ शोध घेत सांगलीत आले. त्यांनी प्रियांकाला कॉल केला, परंतु ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे जकाप्पाला फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ लागला.
त्यामुळे परत शोधाशोध करत असताना आयर्विन पुलाखाली प्रियांकाचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहेत.