राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोपविल्या ‘या’ नवीन जबाबदाऱ्या

मुंबई: राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून एन. नवीन सोना हे पाहतील. तर माणिक गुरसाल यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. मागील आठवड्यात 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या नेमणुकांमुळे प्रशासनामध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे.  सरकारद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे शासनाच्या धोरणे प्रभावीपणे अंमलात आणली जातील.

सरकारच्या या महत्त्वाच्या बदल्यांमुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढवण्याचा उद्देश आहे. नियुक्त अधिकारी लवकरच त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतील.

महत्वाचे बदलले गेलेले IAS अधिकारी:  अतुल पाटणे (IAS:RR:1999): मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई यांना सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

ऋचा बागला (IAS:RR:1999) यांची  नियुक्ती प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

अंशु सिन्हा (IAS:RR:1999) यांची नेमणूक प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे झाली आहे.

एन. नवीन सोना (IAS:RR:2000) हे  सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथून स्थानांतरित होऊन  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव पद सांभाळणार आहेत.

डॉ. रामास्वामी एन. (IAS:RR:2004) यांची  वित्त विभागातील सचिव पदावरून ते सचिव (ADF), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्त झाले आहेत.

वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006) यांची वस्त्रोद्योग विभागातील सचिव पदावरून ते सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

प्रदीप पी. (IAS:RR:2009) यांची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माणिक गुरसाल (IAS:SCS:2009)यांना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.