---Advertisement---

अवैधरीत्या तलवारी बाळगणारे त्रिकूट जाळ्यात, जळगाव गुन्हे शाखेची कारवाई

by team
---Advertisement---

भुसावळ : जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इंदिरा नगर भागातील त्रिकुटाकडून सहा हजार रुपये किमतीच्या चार धारदार तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी (१ एप्रिल) दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. तिन्ही संशयितांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई

जळगाव गुन्हे शाखेला इंदिरा नगर भागातील तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पथकाने छापेमारी करीत भरत यादव खंडारे (१९, रा. इंदिरा नगर, भुसावळ), सागर अनिल संघवी (२०, रा. इंदिरा नगर, भुसावळ) व सागर राजू यादव (२५, रा.इंदिरा नगर, भुसावळ) यांना अटक करीत त्यांच्याकडील सहा हजार रुपये किमतीच्या चार तलवारी जप्त केल्या. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, कॉन्स्टेबल सचिन पोळ आदींच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment