Love Jihad : खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने पोलिसांनी वेळीच दाखल होत त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व त्याचा मित्र जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी फार्मसीचे शिक्षण घेत असून त्याच महाविद्यालयात फरहान हकीम खाटीक हा तिसऱ्या वर्षाला शिकत होता. ते दोघा कॉलेजला एकाच बसने ये-जा करीत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी फरहान खाटीक हा तरुणीला सोशल मीडियावरुन मॅसेज करून तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करीत होता. तो तरुणीला धर्म, जात असे काही नसून प्रेम प्रेम असते असे सांगत होता.
धार्मिक व्हिडीओही दाखविले
त्यानंतर काही दिवसांनी फरहान याने तरुणीला प्रपोज करून तू जर माझा प्रपोज स्वीकारला नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकी देखील दिली होती. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुण हा तरुणीसोबत सोशल मीडियावर चॅटींग करुन तिला एका धर्माबाबत व्हिडीओ टाकून तिला त्या धर्माबाबात आपुलकी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत होता. तरुणीने घाबरुन ही बाब कोणालाही सांगितली नाही.
डीमार्टमध्ये तरुणीसोबतचा प्रकार उघड
ही तरुणी कामानिमित्त बुधवारी सकाळी डीमार्ट येथे खरेदीसाठी आली होती. त्यावेळी संशयित फरहान व एक अनोळखी इसम तिचा पाठलाग करीत तेथे पोहचले. फरहान याने सोबत आणलेला बुरखा तरुणीला जबरदस्तीने परिधान करण्यास सांगितले, बुरखा नाही घातला तर मी आत्महत्या करेन, अशी धमकीदेखील त्याने दिल्यामुळे तरुणीने डीमार्टच्या चेजिंगरुमध्ये बुरखा परिधान केला. बुरखा परिधान केल्यानंतर संशयित फरहान याने माझ्यासोबत खरेदी कर, असे म्हणत तरुणीसोबत खरेदी केली.
तरुणीने पैसे देण्याच्या काऊंटरवर बुरखा काढण्यास सांगितले असता, फरहान याने तू बुरखा काढला तर मी तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यावेळी आजूबाजूचे लोकांनी हे वाक्य ऐकून त्यांना संशय आल्याने मोठा जमाव जमा झाला. जमाव जमल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत डायल ११२ वर कॉल आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणीसह दोघा तरुणांना त्यांनी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित फरहान हकीम खाटीक (वय २३) व जमील कुरेशी (दोघ रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.