पंजाबमध्ये दोन दहशतवाद्यांना चिनी ग्रेनेड आणि दोन पिस्तूलसह अटक

---Advertisement---

 

पंजाब पोलिसांनी गुरुदासपूर येथून दोन दहशतवाद्यांनी अटक केली, त्यांच्याकडून चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि दोन पिस्तूल जप्त केले. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी २५ नोव्हेंबर रोजी गुरुदासपूर पोलिस ठाण्यासमोर स्फोट घडविला होता.

पोलिस महानिरीक्षक संदीप गोयल यांनी सांगितले की, सोमवारी रात्री गुरुदासपूर येथे पुराणा शालाजवळ दोन स्कूटरस्वार हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली आणि संशयितांना थांबण्याचा इशारा केला. पोलिस पथकाला पाहून आरोपींनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी जखमी झाला. अटक केलेल्या आरोपींध्ये शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी झिशान अख्तरचा समावेश आहे.

दोन्ही दहशतवादी बाबर खालसा संघटनेचे असल्याचे तपासात समोर आले. आरोपींकडून चिनी बनावटीचा ग्रेनेड आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आले. दहशतवाद्यांची पंजाबमध्ये हल्ला करण्याची योजना होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरोपी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होते. अमेरिकेतील अमनदीपसिंग उर्फ अमन पन्नूच्या सांगण्यावरून शहजाद भट्टी पंजाबमध्ये हल्ले करण्यासाठी स्थानिक तरुणांचा एक गट तयार करीत होता. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यांनतर त्याचे दोन साथीदार गुरुदत्तसिंग आणि होशियारपूर येथील प्रदीपलाही अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---