---Advertisement---

युरियाचा साठा संपला ; शेतकऱ्यांना मध्य प्रदेश व गुजरातमधून चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय युरिया

---Advertisement---

---Advertisement---

तळोदा : तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून चढ्या भावाने युरीया खरेदी करावा लागत आहे. २६६ रुपयाची युरीया बॅग ४१० रुपयाला खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

तळोदा तालुक्यात खरीप हंगामात पिकांना खतांची मात्रा देण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने कृषी दुकानांवर त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. तालुका कृषी विभागाने तालुक्यात तातडीने युरियाचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत.

तळोदा तालुक्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असल्याने शेतशिवारात पिकांचे देखभाल करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. तालुक्यात मिरची, कापूस, सोयाबीन, ज्वारी, ऊस, मका, पपई आदी पिकांची लागवड केली आहे. सध्या शेतकरी पिकांमधील तण काढणी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. या पिकांना सध्या खतांची अत्यंत आवश्यकता आहे. यात ही युरिया आवश्यक आहे. युरिया खत दिल्यानंतर पिकांची वाढ जलद होणार आहे. खतांअभावी पिकांची वाढ खुंटली असल्याने शेतकरी खत घेण्यासाठी धडपडत आहेत. परंतु, कृषी सेवा केंद्रांमधून युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी आहे.

आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही शेतकरी गुजरात मधील कुकरमुंडा व शहादा तालुक्यालगत मध्य प्रदेश राज्यातील खेतिया परिसरात जाऊन खते आणत आहेत. यासाठी युरीया प्रती बॅग ४१० रुपयाला दिली जात आहे. यासाठी आर्थिक समस्यांचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागत आहे. खता प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने तळोदा तालुक्यात युरियाचा पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. तालुक्यातील काही कृषी दुकांना ना राजकीय पाठबळ असल्याने साठेबाजी होत असल्याचे शेतकर्‍यान मध्ये चर्चिले जात आहे त्यामुळे अधिकारी ही जाणीव पूर्वक दुलक्ष करीत आहेत असा आरोप देखील केला जात आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---