मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

---Advertisement---

मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात एका विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला आपल्या मुलांसह घरात एकटी असतांना हा निंदनीय प्रकार घडला. याप्रकरणी उन्नाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १२ तासांच्या आत झाशी रोडवरून आरोपीला अटक केली.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, बुधवारी रात्री उन्नाव शहरातील शेजारी राहणारा अंकू उर्फ अंकित रायकवार तिच्या घरात घुसला. त्यावेळी पीडितेचा पती कामानिमित्ताने बाहेर गेला होता. महिलेने त्यास विरोध केला असता आरोपीने मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तो घटनास्थळावरून त्याने पळ काढला.

महिलेचा पती कामावरून घरी परतला तेव्हा पीडित महिला आणि मुले जोरजोरात रडू लागली. पतीने या प्रकरणाबद्दल विचारणा केली. यावर महिलेने संपूर्ण घटना तिच्या पतीला सांगितली, त्यानंतर पतीला धक्का बसला. यानंतर पती महिलेला पोलिस ठाण्यात घेऊन गेला आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तसेच, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याची खात्री केली जात आहे. सध्या महिलेच्या जबाबाच्या आधारे प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---