जळगावात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजयुमोची जोरदार निदर्शने

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळत्याच्या घटनेचे महाविकास आघाडी राजकारण करत आहे याच्या निषेधार्थ भाजयुमोने रविवार, १ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कोर्ट चौकात जोरदार घोषणादेत निदर्शन केली. पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्ळ्याला माल्यार्पन करून अभिवादन केले. त्यानंतर कोर्ट चौकात महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शन पुकारले.

यावेळी शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, युवामोर्चा अध्यक्ष महेश पाटील, महामंत्री अनिल देशमुख, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे पाटील, प्रल्हाद सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र मराठे, महादू सोनवणे, संजय शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते महिला या निदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आमदार भोळे
यावेळी आमदार सुरेश भोळे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार जनहिताच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. अलिकडे सुरू केलेली लाडकी बहिण योजना लोकांना पसंतीता पडली आहे. यामुळे महाविकास आधाडीच्या नेत्यांची पाया खालची वाळू घसरली आहे. जनतेचा कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण सुरू केले. असे टीकाराण त्यांनी सोडले. त्यांनी अनेकवेळा महापुरुषांचा अवमान केला. मात्र माफी कधी मागीतली नाही. पुतळा दुर्दवी घटनेची आमच्या नेत्यांनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा आहेत. त्यांचा सर्वाना आदर आहे. असे सांगून आमदार भोळे म्हणाले, राजकारण करण्यापेक्षा त्यांनी विकासाचे राजकारण करावे.

विरोधकांमध्ये नैराश्य – ह.भ.प. जळकेकर महाराज
महायुती सरकार जनतेप्रती योजना राबवित आहे. २२ महिलांसाठीही अनेक योजना राबवित आहे. याबद्दल जनतेतही समाधानाची भावना दिसू लागली आहे. दुसरीकडे जनतेप्रती कार्यक्रम नसल्याने महाविकास आघाडी नैराश्यात आहे. यातूनच त्यांनी शिवाजी महाराज पुतळा राजकारण सुरू केले, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केला. माफी मागीतत्यानंतर खर तर पुतळा राजकारण नसायला नको. छत्रपतीबद्दल सर्वांना आदर आहे. ते सवचि भूषण आहेत, असेही ते म्हणाले.

राजकारण न थांबविल्यास गावबंदी
महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करण्याचे उद्योग विरोधकांनी थांबवावे, अशी विनंती युवामोर्चातर्फे करण्यात आली. आता महाविकास आघाडीने हा विषय थांबवावा, असे आवाहन केले. मात्र त्यांच्या नेत्यांनी जर का महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करण्याचे सुरुच ठेवले तर अशांना जिल्ह्यात गावबंदी केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. महाराज हे रयतेचे राजे आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर सन्मान आहे. असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह शहरातील पदाधिकारी, महिला यात सहभागी झाले.