विद्यापीठ विविध प्राधिकरणासाठी आज मतदान

तरुण भारत लाईव्ह ८ जानेवारी २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणातील काही जागांसाठी  रविवार, 8 जानेवारी रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील 19 मतदान केंद्रातील 25 बुथवर मतदान होत आहे. शनिवारी विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले. या निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन अध्यापक, प्राचार्य आणि विद्यापीठ अध्यापकांच्या गटातून अधिसभेसाठी तसेच विद्यापरिषद आणि काही अभ्यास मंडळे यासाठी ही निवडणूक होत आहे. शनिवारी सकाळी विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील मतदान केंद्रांकडे साहित्यासह वाहनाने रवाना झाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या वाहनांना झेंडी दाखविली. कुलसचिव डॉ. विनोद पाटील, निवडणूक विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील, डॉ. मुनाफ शेख, निवडणूक विभागीय अधिकारी जी. एन. पवार, एस. आर. गोहिल, डॉ. दिनेश पाटील, इंजि. एस. आर. पाटील, के. सी. पाटील, ए. सी. मनोरे, व्ही. व्ही. तळेले आदी यावेळी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेसाठी 182 कर्मचारी नियुक्त आहेत.

या ठिकाणी करता येणार मतदान 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव, नाहाटा महाविद्यालय, भुसावळ, जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय, रावेर, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, डी. एस. पाटील महाविद्यालय, एरंडोल., एम. एम. महाविद्यालय, पाचोरा, बी. पी. कला, एस. एम. ए. विज्ञान व के. के. सी. वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव, झेङ बी. महाविद्यालय, धुळे, व्ही. व्ही. एम संस्थेचे महाविद्यालय, साक्री, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनगीर, जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार, ए. एस. एस. एस. संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर, पुज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, शिंदखेडा, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा.

अशा असतील लढती 
व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून खुला संवर्गातील 4 जागासाठी 6 उमेदवार, महाविद्यालयांच्या अध्यापकांमधून 5 खुल्या संवर्गासाठी 14उमेदवार आहेत, प्राचार्यांमधून 5 खुल्या संवर्गासाठी 7 उमेदवार, विद्यापीठ अध्यापकांच्या गटामधून खुला संवर्गातील1 जागेसाठी 3 उमेदवार, अनुसुचित जमाती संवर्गासाठी1जागेसाठी 2 उमेदवार आणि महिलांसाठी राखीव असलेल्या 1 जागेसाठी 2 महिला उमेदवार अधिसभेसाठी रिंगणात आहेत. विद्यापरिषदेच्या वाणिज्य वव्यवस्थापन विद्याशाखेतील खुलासंवर्गासाठीच्या 1 जागेसाठी 3उमेदवार, विज्ञान वतंत्रज्ञान विद्याशाखेच्या खुलासंवर्गाच्या 1 जागेसाठी2उमेदवार, मानव्य विद्याशाखेच्या खुला संवर्गासाठीच्या 1जागेसाठी 2 उमेदवारआणिइतरमागासवर्ग संवर्गातील 1जागेसाठी 2 उमेदवारनिवडणूक लढवित आहेत. 13 अभ्यास मंडळासाठी देखीलनिवडणूक होणार आहेत. उद्याच्या निवडणुकीत 57 विद्यापीठ अध्यापक, 57 प्राचार्य, 1814 संलग्न महाविद्यालय व परिसंस्थेचे अध्यापक आणि 84 व्यवस्थापन प्रतिनिधी हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.