धुळे, अहिल्यानगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना दक्षतेच्या सूचना

#image_title

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून कालपासून पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शुक्रवारी (18) सायंकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अश्यातच नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज असून या जिल्ह्यासह धुळे, अहमदनगरला हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी (19) सकाळी पावसाने फारसे वातावरण नव्‍हते. परंतु दुपारच्‍या वेळी ढग दाटून येऊन जोरदार पावसाला सुरवात झाली. ढगांच्‍या गडगडाटासह पावसाने लावलेल्‍या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

राज्यातील काही भगात पडत असलेल्या पावसाचा फटका जनजीवनाला बसत आहे तर दुसरीकडे मुंबई, पुण्यातही पाऊस होत आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहार. तसेच धुळे, अहमदनगर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. 17 ते 23 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस पडणार आहे. आज धुळे, नाशिक, अहिल्यानगर ( अहमदनगर ) जिल्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्‍ह्यासाठी ”येलो अलर्ट”
भारतीय हवामान खात्‍याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्‍ह्यात 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्‍टीची शक्‍यता वर्तविण्‍यात आली. अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासाठी ‘ ”येलो अलर्ट’जारी करण्‍यात आलेला आहे तसेच 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली.


नागरिकांना दक्षतेच्या सूचना
अहिल्यानगर जिल्‍ह्यासाठी ”येलो अलर्ट” जारी करण्‍यात आलेला आहे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.