---Advertisement---

Parola News : पारोळाकरांनो पाणी जपून वापरा, शहराला होणार १ दिवस उशिराने पाणीपुरवठा

by team
---Advertisement---

पारोळा : विचखेडा हेड वर्क येथे मोटर चालू असताना अचानक स्टार्टर अचानक शॉर्टसर्किट झाला. यामुळे स्टार्टरमध्ये आग लागून तो जळून खाक झाले आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा १ दिवस उशिराने होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विचखेडा हेड वर्क येथे रविवारी पहाटे ४.३० वाजता पाणी पंपचे स्टार्टर’मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यामुळे स्टार्टर जळून खाक झाले आहे. परिणामी शहराला होणारा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंता संकेत कारले यांनी तभा’शी बोलतांना सांगितले.

शहराला एकूण २३ झोनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाण्याची जास्त आवश्यकता भासते. मात्र ऐन उन्हाळ्यात
पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याने पाण्याच्या वापर जपून करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, काम तांत्रिक स्वरूपाचे असून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करू असे मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment