Palghar: जंगलात शिकारीसाठी गेले अन् प्राणी समजून सहकाऱ्याचीच केली शिकार

पालघर :  जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरशेती गावाजवळ जंगलात शिकारीसाठी गेलेल्या गटात मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी रात्री (४ फेब्रुवारी) ८.४० वाजता, प्राणी समजून चुकून ट्रिगर दाबल्याने ६० वर्षीय रमेश जाण्या वरठा यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा एक सहकारीही जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश जाण्या वरठा आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या सुमारास बोरशेतीच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. दरम्यान प्राणी समजून एकास सहकार्याकडून चुकून बंदुकीचे ट्रिगर दाबलं गेलं.आणि यात एका इसमाचा जागीच  मृत्यू झाला आहे .दुर्घटना घडल्यानंतर मृतदेह जंगलातच सोडून सहकारी पसार झाले होते.

हेही वाचा : एकनाथ खडसे यांचा भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा ? चर्चांना उधाण

गटातील काहीजण झाडांवर बसले होते, तर काहीजण जमिनीवर होते. उशिरा आलेल्या काही सहकाऱ्यांनी मोबाईल टॉर्च सुरू केला नसल्याने प्राणी येत असल्याचा त्यांचा संशय बळावला आणि सहकार्याने चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला. गोळी लागल्याने रमेश जाण्या वरठा यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा :  मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ

सहकार्याचा मृत्यू झाला हे लक्षात येताच मृत सहकार्याला तसेच टाकून इतर सहकार्यांनी जंगलातून पळ काढला .जंगलात मृतदेह सापडल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली.

घटना घडल्यानंतर मृतदेह जंगलातच सोडून इतर शिकारी पसार झाले. मात्र, आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना कळवले. मनोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात ते आठ जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने अवैध शिकारीच्या घटनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावठी कट्ट्यांचा वाढता वापर आणि शिकारीसाठी होणारी बेकायदेशीर हालचाल रोखण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिस अधिक तपशील लवकरच जाहीर करणार आहेत.