दुर्दैवी! मित्रांसोबत गेला पतंग उडवायला अन् घडले अघटित

विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा जोरदार झटका बसल्याने मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी  घडली आहे. लोकेश सोपान पाटील (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

२५ जानेवारीला संध्याकाळी लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना लोकेशचा पतंग विद्युत तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्यासाठी लोकेश हा जवळच राहत असलेल्या त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर गेला. विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना त्याला विजेचा जबर धक्का बसला. विजेचा धक्का एवढा जबर होता कि, त्यात लोकेश याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ, जिल्हा बँकेचा निर्णय

घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला.

घरची परिस्थिती हलाखीची

लोकेश हा आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू यांच्यासह पाळधी येथे वास्तव्यास होता. पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे घरची परिस्थिती हलाखीची होती.

हेही वाचा: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सगल दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव