Police Recruitment 2025 : पोलीस भरतीचा सराव करताय? मग ही बातमी वाचाच…

---Advertisement---

 

जळगाव : पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव सुरू असून, उमेदवार भल्या पहाटे धावणे, कसरती करत आहेत. पहाटे धुके, अपुऱ्या प्रकाशात सराव करताना काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. पोलिस मुख्यालय परिसरातील मैदान, शिवतीर्थ मैदानासह मेहरुण तलाव परिसरात दररोज उमेदवार कसरत करीत आहेत.

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ या कालावधीतील पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यभरात पोलिस दलामध्ये विविध पदे भरली जात आहेत. यात जळगाव जिल्ह्यात पोलिस शिपाई पदासाठी १७१ जागांवर भरती होत आहे.

रस्त्यावर सराव करताना काय काळजी घ्याल?


उड्डाणपूल, रस्त्यावर सराव करायचाच असेल तर रस्त्याच्या कडेने धावले पाहिजे. यातून वाहतुकीला अडथळा न होण्यासह स्वतःची सुरक्षितताही जपली जाऊ शकते.

भरधाव वाहने, अंधूक प्रकाशाचा धोका


मैदाने सोडून इतर ठिकाणी सराव करत असताना भरधाव वाहनांसह सकाळी अंधूक प्रकाशाचाही धोका असतो. धुके, अंधूक प्रकाशात अचानक वेगाने येणाऱ्या वाहनापासून धोका टाळण्यासाठी मैदानांवरच सराव करणे योग्य ठरते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---