जिल्ह्यातल्या सिंचन योजनांचे घोडे आडले कोठे?

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । तापी, गिरणा, वाघूर, तितूर यासारख्या नद्यांचे विस्तीर्ण पात्र लाभलेला जळगाव जिल्हा जलसंपदेत सुखी मानला गेला पाहिजे. मात्र तशी परिस्थिती येथे नाही. पाणी भरपूर येते, पण ते गुजरातच्या दिशेने वाहून जाते. एकट्या  तापी नदीबाबतची माहिती घेतली असता या नदीवर असलेल्या हतनूर धरणातून दरवर्षी एवढे प्रचंड पाणी वाहून जाते की, ‘हतनूर’ सारखी १० धरणे भरू शकतील. नदीतून पाणी वाहून जाते, मात्र त्याचा वापर करता येत नसल्यामुळे नदी काठावरील बळीराजाच्या डोळ्यात पाणी येते. आजही या जिल्ह्यातील काही तालुक्यांची ओळख ही ‘अवर्षण प्रवण’ म्हणून आहे. येथे पावसाळ्यात धो- धो पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात महिला, लहान-लहान मुले डोक्यावर हंडा घेऊन दूर-दूरहून पाणी आणत असल्याचे दृश्य वर्षानुवर्षे दिसत आहे. हा जिल्हा सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध व्हावा म्हणून मोठ्या प्रयत्नानंतर येथे तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना झाली.

जळगाव, धुळे व नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या या  महामंडळाच्या स्थापनेनंतर हरितक्रांतीचे स्वप्न या तीन जिल्ह्यातील बळीराजाला  पडत होते. नाही म्हणता काही प्रकल्पांनी आकार घेतला, पाणी थांबू लागले. मात्र अद्यापही अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्यांना वाली कोण? असा प्रश्न पडत असतो. अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज, तापी मेगा रिचार्ज प्रकल्प असे एक ना अनेक प्रकल्पांचे काम वर्षांनुवर्षांपासून सुरू आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पास तर तत्कालिन जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या भव्यतेचे कौतुक केले होते. केंद्र शासनाकडूनही या प्रकल्पास मदत मिळणार होती आणि बरीचशी मिळालीही. तापी नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. १९९९ पासून तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या उभारणीची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ही प्रक्रिया थांबली होती. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून वाहणाऱ्या तापी नदीच्या उजव्या आणि डाव्या तीरावर सातपुडा पर्वतरांगा असून हा भाग जलभूगर्भीय भूभ्रंश आहे. या भूभ्रंशामुळे एक ते चार किलोमीटर रुंदीचा पाणी झिरपण्याची क्षमता असलेला ‘बझाडा झोन’ तयार झालेला आहे. आज पाण्याचा होत असलेला वापर आणि जमिनीत जिरणारे पाणी यातील तफावतीमुळे भूजल पातळी ही तापी, गिरणा, वाघूर, तितूर यासारख्या नद्यांचे विस्तीर्ण पात्र लाभलेला जळगाव जिल्हा जलसंपदेत सुखी मानला गेला पाहिजे. मात्र तशी परिस्थिती येथे नाही. पाणी भरपूर येते, पण ते गुजरातच्या दिशेने वाहून जाते. एकट्या तापी नदीबाबतची माहिती घेतली असता या नदीवर असलेल्या हतनूर धरणातून दरवर्षी एवढे प्रचंड पाणी वाहून जाते की, ‘हतनूर’ सारखी १० धरणे भरू शकतील. नदीतून पाणी वाहून जाते, मात्र त्याचा वापर करता येत नसल्यामुळे नदी काठावरील बळीराजाच्या डोळ्यात पाणी येते. आजही या जिल्ह्यातील काही तालुक्यांची ओळख ही ‘अवर्षण प्रवण’ म्हणून आहे. येथे पावसाळ्यात धो- धो पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात महिला, लहान-लहान मुले डोक्यावर हंडा घेऊन दूर-दूरहून पाणी आणत असल्याचे दृश्य वर्षानुवर्षे दिसत आहे. हा जिल्हा सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध व्हावा म्हणून मोठ्या प्रयत्नानंतर येथे तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना झाली. जळगाव, धुळे व नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या या महामंडळाच्या स्थापनेनंतर हरितक्रांतीचे स्वप्न या तीन जिल्ह्यातील बळीराजाला पडत होते. नाही म्हणता काही प्रकल्पांनी आकार घेतला, पाणी थांबू लागले. मात्र अद्यापही अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्यांना वाली कोण? असा प्रश्न पडत असतो. अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज, तापी मेगा रिचार्ज प्रकल्प असे एक ना अनेक प्रकल्पांचे काम वर्षांनुवर्षांपासून सुरू आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पास तर तत्कालिन जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या भव्यतेचे कौतुक केले होते. केंद्र शासनाकडूनही या प्रकल्पास मदत मिळणार होती आणि बरीचशी मिळालीही. तापी नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. १९९९ पासून तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या उभारणीची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ही प्रक्रिया थांबली होती. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून वाहणाऱ्या तापी नदीच्या उजव्या आणि डाव्या तीरावर सातपुडा पर्वतरांगा असून हा भाग जलभूगर्भीय भूभ्रंश आहे. या भूभ्रंशामुळे एक ते चार किलोमीटर रुंदीचा पाणी झिरपण्याची क्षमता। असलेला ‘बझाडा झोन’ तयार झालेला आहे. आज पाण्याचा होत असलेला वापर आणि जमिनीत जिरणारे पाणी यातील तफावतीमुळे भूजल पातळी हीतापी, गिरणा, वाघूर, तितूर यासारख्या नद्यांचे विस्तीर्ण पात्र लाभलेला जळगाव जिल्हा जलसंपदेत सुखी मानला गेला पाहिजे. मात्र तशी परिस्थिती येथे नाही. पाणी भरपूर येते, पण ते गुजरातच्या दिशेने वाहून जाते. एकट्या तापी नदीबाबतची माहिती घेतली असता या नदीवर असलेल्या हतनूर धरणातून दरवर्षी एवढे प्रचंड पाणी वाहून जाते की, ‘हतनूर’ सारखी १० धरणे भरू शकतील. नदीतून पाणी वाहून जाते, मात्र त्याचा वापर करता येत नसल्यामुळे नदी काठावरील बळीराजाच्या डोळ्यात पाणी येते. आजही या जिल्ह्यातील काही तालुक्यांची ओळख ही ‘अवर्षण प्रवण’ म्हणून आहे. येथे पावसाळ्यात धो- धो पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात महिला, लहान-लहान मुले डोक्यावर हंडा घेऊन दूर-दूरहून पाणी आणत असल्याचे दृश्य वर्षानुवर्षे दिसत आहे. हा जिल्हा सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध व्हावा म्हणून मोठ्या प्रयत्नानंतर येथे तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना झाली.

जळगाव, धुळे व नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या या महामंडळाच्या स्थापनेनंतर हरितक्रांतीचे स्वप्न या तीन जिल्ह्यातील बळीराजाला पडत होते. नाही म्हणता काही प्रकल्पांनी आकार घेतला, पाणी थांबू लागले. मात्र अद्यापही अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्यांना वाली कोण? असा प्रश्न पडत असतो. अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प, शेळगाव बॅरेज, तापी मेगा रिचार्ज प्रकल्प असे एक ना अनेक प्रकल्पांचे काम वर्षांनुवर्षांपासून सुरू आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पास तर तत्कालिन जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या भव्यतेचे कौतुक केले होते. केंद्र शासनाकडूनही या प्रकल्पास मदत मिळणार होती आणि बरीचशी मिळालीही. तापी नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. १९९९ पासून तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या उभारणीची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ही प्रक्रिया थांबली होती. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून वाहणाऱ्या तापी नदीच्या उजव्या आणि डाव्या तीरावर सातपुडा पर्वतरांगा असून हा भाग जलभूगर्भीय भूभ्रंश आहे. या भूभ्रंशामुळे एक ते चार किलोमीटर रुंदीचा पाणी झिरपण्याची क्षमता। असलेला ‘बझाडा झोन’ तयार झालेला आहे. आज पाण्याचा होत असलेला वापर आणि जमिनीत जिरणारे पाणी यातील तफावतीमुळे भूजल पातळी ही खालावत चाललेली आहे. यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादन घेतले जात असलेल्या पटव्यात तर भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. पाचशेपेक्षा अधिक फूट खोल खोदूनही पाणी लागत नाही, अशी या भागाची परिस्थिती आहे. पाण्याचा उपसा प्रचंड होतो पण भूगर्भात पाणी जात नाही. त्यामुळेच महाकाय पुनर्भरण योजना प्रस्तावित करण्यात आली. तापी नदीचे गुजरातला वाहून जाणारे पाणी मेळघाटातील खारीया घुटीजवळ अडवून नंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून त्याचे जमिनीत पुनर्भरण) केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला २० टीएमसी, तर मध्य प्रदेशला २५.५० टीएमसी असे ४५.५० टीएमसी पाणी तापी नदीतून वापरता येणार आहे. पावसाळ्यात खारीया घुटी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील तालुक्यात ठिकठिकाणी नदी-नाल्यात सोडले जाईल. या योजनेमुळे प्रत्यक्ष सिंचन १ लाख २ हजार हेक्टरमध्ये होणार असून, महाराष्ट्रात २४ हजार हेक्टर, तर मध्य प्रदेशात ७८ हजार हेक्टरमध्ये होईल. पुनर्भरणाद्वारे अप्रत्यक्ष लाभ महाराष्ट्राला २ लाख ११ हजार हेक्टर, तर मध्य प्रदेशला ९६ हजार हेक्टर असा एकूण ३ लाखांचा १० हजार हेक्टरमध्ये अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. मात्र सद्यःस्थितीत हे काम रेंगाळले आहे. प्रकल्पास केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे. हीच परिस्थिती तापीवरील निम्न तापी प्रकल्पाची आहे. प्रकल्पासाठी अमळनेरकरांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र फारसा उपयोग नाही. तसेच परवा याच नदीवरील शेळगाव बॅरेजबाबत विधान परिषदेत चर्चा  झाली. याचप्रमाणे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही सिंचन प्रकल्पांची कामेही रेंगाळली आहे. खान्देशातील बळीराजाचे हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्याकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची करज आहे. तेव्हाच ही कामे पूर्ण होऊ शकतील.