‘त्यांना’ पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय वरिष्ठ घेतली : मंत्री गिरीश महाजन

जळगाव : राजकीय वर्तुळात, महाविकास आघाडीच्या भविष्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. भाजपाचे  राज्य आणि केंद्र सरकारच्या बहुमतात आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या अनेक नेते भाजपात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. मात्र, त्यांना प्रवेश द्यायचा की नाही त्याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे योग्य तो निर्णय घेतली अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहेत तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर राजकीय वर्तुळात, महाविकास आघाडीच्या भविष्यासंदर्भात आणि महाविकास आघाडीचे काही नेते भाजपात प्रवेश करणार याबाबत चर्चा सुरू आहेत. जळगावातील काही नेतेही भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीर मंत्री गिरीश महाजन जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले,  भाजपाचे राज्य आणि केंद्र सरकार बहुमतात असल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या मनात पक्षात सामील होण्याची इच्छा निर्माण झाली आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात योग्य निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पत्रकारांनी भुसावळ नुकत्याच घडलेल्या खून घटनेबाबत आणि एकदंरीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला असता मंत्री महाजन म्हणले, भुसावळमध्ये घडलेला एखुनाचा प्रकार धक्कादायक आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, हे प्रकरण टोळी युद्धाशी जोडले जात आहे. गेल्या दोन वर्षांत येथे एक मोठा मर्डर प्रकरण घडला होता, ज्यात शेख गटाने पठाण गटाचा खून केला होता. सध्या या घटनेच्या संदर्भात बदला घेण्यासाठी मारेकरी बाहेर आले असून, त्यांच्यातील आपसातील मतभेद आणि अवैध धंदे यातून हा वाद निर्माण झाला आहे.


मंत्री महजन पुढे म्हणले की, या टोळीतले सदस्य रेल्वे परिसरात घुटका विकण्याचा व्यवसाय करत होते. या प्रकरणात गेल्या वेळेस मारेकरी बाहेर आल्यानंतर, त्यांनी सदस्यांचा बदला घेतला आहे. एकंदरीत, या टोळीचा वाद व त्यांच्या गुन्हेगारी व्यवसायामुळे हे सर्व घडले आहे.

याच दरम्यान, भुसावळ आणि चाळीसगावमध्ये या प्रकारांच्या आधी देखील गुंडगिरीच्या घटना घडल्या आहेत. चाळीसगावमध्ये मोरे नगरसेवकाचा खून झाल्यानंतर भोसले आणि मोरे गटातील वाद उफाळले होते. भुसावळमध्येही असाच एक खून झाला होता. आजच्या घटनेत, दारुच्या नशेत एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला, मात्र सौम्य प्रकारात कुठलेही जखमी झाले नाहीत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यामुळे पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, आरोपी लवकरच पकडले जातील.

मंत्री महाजन यांनी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, त्यांनी पोलिसांना गुंडगिरी आणि टोळ्यांचा नायनाट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील गुंडगिरीविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.

राजकीय वर्तुळात, महाविकास आघाडीच्या भविष्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. भाजपाचे राज्य आणि केंद्र सरकार बहुमतात असल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या मनात पक्षात सामील होण्याची इच्छा निर्माण झाली आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात योग्य निर्णय घेतले जातील, असे देखील स्पष्ट केले गेले आहे.

महाविकास आघाडीतील गटबाजी आणि मतभेद समोर आले आहेत. गटबाजीमुळे या आघाडीतील नेत्यांचे लक्ष वेधले जात आहेत. विरोधी पक्षांच्या गोंधळाने ते सर्व दिशाहीन झाले आहेत.

पालकमंत्री पदावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये दररोज चर्चा होत असून, २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे मत मंत्री महाजन यांनी व्यक्त केले.