---Advertisement---

अयोध्या नगरातील रस्त्यांना वाली कोण ? नागरिकांचा सवाल

by team
---Advertisement---

राहुल शिरसाळे
जळगाव
: काय वर्णावी या महानगराची थोरवी. मोठमोठ्या नेत्यांनी या शहराला घडवलं, नावारूपाला आणलं. काहींनी तर अगदी गल्ली बोळातील रस्ते काँक्रीटचे केले. कित्येक वर्षे त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागली नाही. काम असावं तर असं चिरकाल टिकणारं. मी रस्ता बोलतोय…! मी हाडामांसाचा नाही. मला आकार नाही. मी निराकार…! पण मला भावना आहेत… वारंवार काळीज चिरणारा तो जेसीबीच्या लोखंडी दात्यांचा घणाघाती आघात….. आणिक काय काय सहन करतो मी. कशासाठी? कुणासाठी? रस्त्यांसाठी लोकांनी खात्त्या खूप खस्ता, नसेल नेत्याचा वरदहस्त, तर तुझा ताणाणा निरर्थक आहे दोस्ता. आपल्या

जळगाव महानगराचा भाग.. अयोध्या नगर, हे शहराचंच एक उपनगर या भागातील रस्त्याची ही व्यथा अन् कथा. केला असा काय गुन्हा… की मी उपेक्षित राहिलो पुन्हा…. हा रस्ता म्हणून माझा सवाल. या भागातील स्वामी समर्थ केंद्र… प्रत्यक्ष दत्त प्रभूचं उपासना मंदिर… त्याच्या जवळील हा रस्ता… सेवेकऱ्यांची सेवा कमी पडली की, नेत्याची मनधरणी. कोणाचा रोष असेल हा… परिसरातील बाकीचे रस्ते झाले… अन् हाच रस्ता का नाही झाला? असा या भागातील रहिवाशांचा प्रश्न, आम्हीसुद्धा त्यांनाच मतदान केलं. मग आमच्यावर अवकृपा का? असा तळमळीचा मुद्दा. पण एक शायर म्हणतो, “बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिखो, मजबुरियों को मत कोसो, हर हाल में चलना सिखों।’

रस्ता झाला. तो पुन्हा खराब झाला. ही इतर ठिकाणांची समस्या, मात्र येथे तर रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आम्ही शहाचे नागरिक नाहीत का? आम्हाला सोयीसुविधांचा अधिकार नाही का? मग आमचा रस्ता कोण बनवणार? सध्या तर प्रशासक राज आहे. मग ते तरी देतील का लक्ष? होईल का आमचा रस्ता ?

या भागात साठ ते सत्तर घरे आहेत. निवडणुकीपूर्वी आमचा रस्ता बनला होता. नंतर तो खराब झाला. मात्र इतरत्र सिमेंटचे रस्ते झाले अन् आमचा रस्ता तसाच राहिला. आम्ही पण सत्तेत असलेल्यांनाच मतदान केले होते. मात्र पुढाऱ्यांच्या लाभार्थीचेच रस्ते होत आहेत. आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भेदभाव न करता आमचाही रस्ता केला पाहिजे. रस्ते बनवताना धरसोड का केली जाते?
अविनाश भास्कर पाटील, अयोध्या नगर.

स्वामी समर्थ केंद्राजवळील रस्त्यासंदर्भात त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही हा त्रास सोसावा लागतोय. आपल्या समर्थक लोकांच्याच घरांसमोरील रस्ते तत्कालीन निवडून आलेल्या लोकांनी तयार केले. आम्हाला रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. रस्त्याबद्दल आमची नाराजी आहे.
हर्षदा अविनाश पाटील, अयोध्या नगर

रस्त्याबद्दलच आमची नाराजी आहे. आमची लेकरं रस्त्यावरच खेळतात. तो नीट नाही. गटारी केल्या, त्यांना काढणारं कोणी नाही. रस्ता झाडणारं कोणी नाही. गटारी तुंबल्या म्हणजे डास वाढतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आम्हालाही आरोग्याच्या, रस्त्याच्या सुविधा मिळाव्यात एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला निवडून येण्यापूर्वी आश्वासनं देतात. पण निवडणूक संपली कोणी फिरकत नाही.
ललिता सपकाळे, अयोध्या नगर

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment