---Advertisement---
---Advertisement---
कौटुंबिक वादाला कंटाळून एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी स्वतःवर चाकूने वार केला. पत्नीला घरी परत आणण्याचा वारंवार प्रयत्न करूनही अपयशी ठरल्यानंतर, रागाच्या भरात आणि निराश होत त्या तरुणाने भाजीपाला कापणाऱ्या चाकूने स्वतःच्या पोटात वार केले. त्याला जखमीला गंभीरस्थितीत तरुणाला सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना हनुमंतपुरा क्रॉसिंगजवळ घडली. पंकज ओझा वय ३०, रा. महामाई , जि. इटावा, उत्तर प्रदेश) हा त्याची पत्नी पूनमची मनधरणी करण्यासाठी आला होता.
दोघांचेही लग्न १२ वर्षांपूर्वी झाले होते. दोघांनाही तीन मुले आहेत. पत्नी पूनम गेल्या काही महिन्यांपासून अजितगढिया सहानसो येथील तिच्या माहेरी राहत होती. ही घटना उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सहन्सो पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी संध्याकाळी घडली आहे.
पंकजच्या पत्नीने तो तिला दारुच्या नशेत तिला दररोज मारहाण करायचा असा आरोप केला आहे. या सततच्या मारहाणीला कंटाळून तिने जानेवारीमध्ये पतीचे घर सोडले. चार महिन्यांपूर्वी पूनमने पंकजविरुद्ध न्यायालयात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी दोघे सोमवारी न्यायालयात हजर होते. सुनावणीनंतर, पंकज आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी सहांसो येथे पोहोचला आणि दुकानात गेला आणि तिला घरी येण्याबाबत मनधरणी करु लागला. परंतु, पूनमने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला.
पूनमने दिलेल्या नाकारलामुळे पंकज निराश झाला. पंकजने काही अंतर पुढे चालत जात त्याने खादी आश्रमाजवळ स्वतःच्या पोटात चाकूने वार केले. तो काही वेळ रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून होता. यानंतर, त्याने पोटावर टॉवेल बांधला आणि सुमारे २०० मीटर चालत खाली पडला. रस्त्याने जाणाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर सैफई वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.