---Advertisement---
राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय सेवांसाठी सरकारने नुकतेच हे दर निश्चित केले आहे. ओपीडी केस पेपर साठी आता पाच रुपये तर साधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 40 हजार रुपये आकारले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयांमध्ये हे दर लागू होणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी मोफत उपचारांच्या निर्णयाला मस्त गीते मिळणार का असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित झाला आहे.
शासकीय रुग्णालयांमधील उपचारांसाठी नवे दर लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने 16 जानेवारी रोजी जाहीर केला. मात्र गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे मोफत असलेले केस पेपर आणि तपासण्या व विविध उपचारांसाठी दर नमूद करण्यात आले आहेत त्यामुळे या दरांची अंमलबजावणी तातडीने होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शासनाच्या निर्णयानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना दररोज दहा रुपये प्रवेश शुल्क द्यावा लागणार आहे. हिमोग्लोबिन टीएलसी, डीएलसी, रक्तगट व आर एच तपासणी, लघवीच्या चाचण्या व यासह विविध रक्त तपासण्यासाठी 15 रुपये शुल्क आकारला जाणार आहे मूत्रपिंड व मूत्राशय तपासणी एक्स-रे साठी 100 रुपये आकाराला जाणार आहे. डोक्याचा सिटीस्कॅन साठी 300 रुपये शुल्क तर मणका व मान व छातीच्या सिटीस्कॅनसाठी 400 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. यासह लहान-मोठ्या शस्त्रक्रियांसाठी 60 ते 160 रुपये शुल्क आकारले जातील तसेच एम आर आय स्कॅन साठी 1600 रुपये शुल्क हे लागणार आहे.
राज्य शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार काही उपचारांना मोफत लाभ हा कायम राहणार आहे यामध्ये शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका, वैद्यकीय पॅरामेडिकल, ऑक्यूपेशनल थेरपी व फिजिओथेरपीचे विद्यार्थी, न्यायालयीन कोठडीत असलेले व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय न्याय वैद्यकीय प्रकरणातील रुग्ण, न्यायालयीन चौकशीतील कैदी, पोलिसांतर्फे आलेली प्रकरण, तसेच कुष्ठरोग मंडळातर्फे आलेले रुग्ण, आश्रम शाळा व महिला सुधार गृहमार्फत आलेले रुग्ण, शहरातली व निमशहरातले निराधार मुलं, आमदार खासदार मंत्री विधानसभा/विधान परिषदेचे अध्यक्ष, माजी सदस्य व न्यायाधीश यांचा समावेश असणार आहे.
वैद्यकीय सेवेतील दर नेमके काय आहेत ?
- पहिली प्रसुती ही मोफत असेल; दुसऱ्या प्रसुतीसाठी 50 रुपये शुल्क, तिसऱ्या प्रसुतीसाठी तसेच पुढील प्रत्येक प्रसूतीसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल.
- नर्सिंग होमच्या एसी खोलीसाठी दररोज 150 रुपये तर नॉन एसी खोलीसाठी 75 रुपये शुल्क आकारल जाईल.
- अतिदक्षता विभागासाठी दररोज 100 रुपये शुल्क, प्रत्येक हिमोडायलिसिस साठी 150 रुपये शुल्क आकारला जाईल.
- वेगवेगळ्या प्रमाणपत्रांसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत खाजगी संस्थांना देण्यात येणाऱ्या मृतदेहांच्या एम्बाल्मिंगसाठी 1500 रुपये शुल्क आकारले जातील.
- रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी प्रति किलोमीटर 5 रुपये आणि 8 तासांपेक्षा अधिक थांब्यासाठी प्रति तास 30 रुपये प्रतिक्षा शुल्क आकारले जाणार.
- सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 40 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आला आहे.









