सध्याच्या बाजार स्थितीकडे पाहता, भारतीय शेअर बाजारात सलग चार दिवसांपासून घसरण होत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 7.68 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभागांची विक्री सुरू असल्याने बाजारात ही घसरण झाली आहे.
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक कमजोर संकेत, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि खासगी बँक व ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये घट यामुळे सेन्सेक्स व निफ्टीवर मोठा दबाव आला आहे.आज दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी घसरून ७६,२०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी ३४४ अंकांनी घसरून २३,०५० च्या खाली घसरला. सलग पाचव्या सत्रांत सेन्सेक्स- निफ्टी घसरले आहेत.
रिच डॅड पूअर डॅडचे लेखक कियोसाकी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल x वर लिहिले आहे की, रिच डॅड्स प्रोफेसी-२०१३ मध्ये, मी इशारा दिला होता की इतिहासातील शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण होणार आहे. ही घसरण या महिन्यात फेब्रुवारीमध्ये होईल. पुढे, त्यांनी लिहिले की या काळात चांगली बातमी अशी आहे की या घसरणीत सर्व काही स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कार आणि घरे आता स्वस्तात उपलब्ध होतील.
येथे करावी गुंतवणूक
या काळात पैसे कुठे कमवायचे याची माहिती अमेरिकन व्यावसायिकाने दिली आहे. त्यांनी सांगितले की या काळात तुमचे पैसे बिटकॉइनमध्ये कमावता येतील. कारण स्टॉक आणि बाँड मार्केटमधून पैसे काढून अब्जावधी रुपये बिटकॉइनमध्ये गुंतवले जातील. जेव्हा मार्केट क्रॅश होईल तेव्हा बिटकॉइन राजा होईल आणि वेगाने वाढेल.
त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की अशा परिस्थितीत लोकांनी बनावटीतून बाहेर पडून क्रिप्टो, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी. एक सतोशी (बिटकॉइनची सर्वात लहान एकक किंवा ०.००००००००१ बिटकॉइन) देखील तुम्हाला श्रीमंत बनवू शकते, तर लाखो लोक सर्वकाही गमावतील.
अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करून विविध पर्यायांचा विचार करावा. तथापि, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे उचित ठरेल.