---Advertisement---

जळगावात महिला सशक्तीकरण अभियान : पालकमंत्र्यांचे बहिणींना उपस्थितीचे आवाहन

by team
---Advertisement---

जळगाव :  शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘ असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं पाऊल असेल. महाराष्ट्र शासनाकडून हे मोठे कार्य होत आहे, हा एका अर्थानी परमार्थ आहे. अशा कार्याची सुरुवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये होत आहे. 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक बहिणींनी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ते जिल्ह्यातील आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकानिहाय अध्यक्ष,सचिव यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी, यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमासाठी भगिनी येणार आहेत. त्यांची जबाबदारी त्या त्या तालुका समितीचे पदाधिकारी, अधिकारी यांची राहणार आहे. ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या पदाधिकारी यांना सन्मानाने सहभागी करून घेवून या कार्यक्रमाला अधिकाधिक, भगिनी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बहिणीला येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ‘ लाडक्या बहिणीला ही ओवाळणी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला हा भावनिक पदर आहे. अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

दरम्यान, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील , आ.लता सोनवणे यांनीही काही महत्वाच्या सूचना यावेळी केल्या.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment